Product Description
कोणासाठी – कधी – काय – कशासाठी – कसे – कुठे
प्रत्येक व्यवसाय हा या प्रश्नांनी ग्रासलेला असतो. या प्रश्नांची उत्तरे मिळाली की सहजच विचारांची गुंतागुंत थांबते आणि सरळ मार्गाने वाटचाल करता येते. चला तर मग जाणून घेऊ या FABRICATION व्यवसाय करताना येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे…
कोणासाठी?
आजकालचे युवक बेरोजगारीने त्रस्त आहेत आणि ही बेरोजगारी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करतेय हे आपण जाणतोच. कमी पैशात लवकरात लवकर सुरू करून फायदा करून देणारा हा व्यवसाय म्हणजे FABRICATION 🧑🏭 अर्थात मेटल वर्क! कुठलाही अनुभव नसला तरी हा व्यवसाय तुम्ही करू शकता, पण मेहनत आणि सदैव तत्पर राहण्याची तयारी हवी.
कोण ?
नितीन देशपांडे हे नाव संपूर्ण भारतात FABRICATION व्यवसायात अग्रगण्य आहे. त्यांचा ३० वर्षांचा अनुभव आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीची निवड यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना सल्ला, मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य तरुणांसाठी त्यांच्या अनुभवाचा खजिना खुला करण्याचा त्यांनी विचार केला आहे. अशा एक अनुभवपूर्ण व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात आपण चार तास असाल. त्यांचे विचार ऐकायला एक एक मिनिट अमूल्य असणार आहे. २० भाग्यशाली तरुणांना ही संधी उपलब्ध असेल. तयार राहा.
का?
हा व्यवसाय करायचा कसा? किती भांडवल 💰 लागेल? व्यवसाय कुठून आणायचा? फायदा किती होईल? बाजारात मंदी असताना व्यवसाय कसा चालेल? असे बरेच प्रश्न साहजिकच तुमच्या मनात येणार आहेत. ही उत्तरं तुम्हाला मिळावीत म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कसे?
ही कार्यशाळा अनुभवायची असेल तर बुकिंग करणे आवश्यक आहे. १ ते ५ ऑगस्ट सकाळी ९ ते १ आणि संध्याकाळी ५ ते ९ अशा वेगवेगळ्या सोयीच्या वेळांमध्ये ही कार्यशाळा आयोजित केली आहे. वरीलपैकी कुठलीही एकच वेळ तुम्ही निवडायची आहे. ही वेळ आणि तारीख सिलेक्ट करून तुम्ही ONLINE सीट बुक करू शकता. मर्यादित २० जागा असल्यामुळे आणि वैयक्तिक प्रश्नांना उत्तरे देता यावीत म्हणून ही मर्यादित आसन क्षमता आहे. बुकिंग केल्यावर स्वारगेट, पुणेजवळील ट्रेनिंग सेंटरचा पत्ता आणि लोकेशन त्वरित पाठवले जाईल. कृपया आपला whatsapp नंबर नमूद करावा.
केव्हा?
सोमवार १ ऑगस्ट ते शुक्रवार ५ ऑगस्ट दरम्यान दररोज दिवसातून दोन वेळा ही कार्यशाळा असणार आहे. तुमच्या सोयीसाठी तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळची कुठलीही एकच बॅच निवडायची आहे. ही कार्यशाळा प्रत्येकासाठी चार तास एकदाच अनुभवायची आहे. त्यामुळे सकाळी ९ ते १ किंवा संध्याकाळी ५ ते ९ या वेळेपैकी सोयीची एक वेळ निवडावी.
कुठे?
ही कार्यशाळा स्वारगेट, पुणेजवळील ‘विक्रीकला’ ट्रेनिंग सेंटरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आपण सीट बुक करून पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ई-मेल किंवा मेसेज येईल. त्याचबरोबर पत्ता, ठिकाण शेअर करण्यात येईल. काही अतार्किक प्रश्न असल्यास आमच्या whatsapp नंबरवर मेसेज केल्यास तुम्हाला मार्गदर्शन करता येईल.
चला भेटू या !